Pune Crime News : माजी खासदार संजय काकडे यांना पत्नीसह अटक आणि जामिनावर सुटका

एमपीसीन्यूज : मेव्हण्याला धमकावल्या प्रकरणी भाजपाचे माजी खासदार संजय काकडे आणि त्यांची पत्नी उषा काकडे यांना गुरुवारी सकाळी चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर दोघांचीही न्यायालयाने जामिनावर सुटका केली.

काकडे यांचे मेव्हणे युवराज ढमाले (वय 40) यांना गोळ्या घालून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात काकडे दाम्पत्यावर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी ढमाले यांनी फिर्याद दिली आहे.

चतुशृंगी पोलिसांनी काकडे दाम्पत्याला आज सकाळी अटक केल्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता दोघांचीही जामीनावर सुटका करण्यात आली.

काय आहे प्रकरण

फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. संजय काकडे आणि फिर्यादी यांच्यामध्ये सुरुवातीला भागीदारीत व्यवसाय होता. मात्र, त्यांच्यात मतभेद निर्माण झाल्यामुळे 2010 पासून दोघेही स्वतंत्ररीत्या व्यवसाय करतात.

ऑगस्ट 2018 मध्ये फिर्यादी संजय काकडे यांच्या घरी गेले असता काकडे यांनी ‘तुला संपवायला वेळ लागणार नाही, तू पैशाचा माज येऊ देऊ नकोस, तुला आणि तुझ्या कुटुंबाला सुपारी देऊन संपवेल’, अशा शब्दात फिर्यादी यांना धमकी दिली. त्यानुसार काही दिवसांपूर्वी काकडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.