-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune Crime News : स्वारगेट परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – स्वारगेट परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी शस्त्रे, सोटे, तलवारी जवळ बाळगून प्रवाशांना लुटण्याच्या तयारीत होते. जनसेवा शौचालय, स्वारगेट याठीकाणी ही शनिवारी (दि.19) रात्री आठच्या सुमारास कारवाई करण्यात आली.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

युवराज नामदेव गायकवाड (वय-31, रा.सेटलमेंट कॉलनी, सोलापुर), बजरंग बलभीम गायकवाड (वय-45), संतोष छोटु जाधव (वय-37, दोघेही रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) व प्रभु बाबुराव जाधव (वय-54, रा. सेटलमेंट कॉलनी, सोलापुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आरोपी शस्त्रे, सोटे, तलवारी जवळ बाळगून प्रवाशांना लुटण्याच्या तयारीत होते. त्यांच्याजवळ एक लोखंडी तलवार, एक कटर व मिरची पावडर इत्यादी साहित्य मिळून आले. गुन्हे शाखा, युनिट दोनच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन शस्त्रे जप्त केली. आधिक तपास गुन्हे शाखा, युनिट दोनचे सहा.पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.