Pune Crime News : तलवार, मिरची पूड घेऊन दरोड्याच्या तयारीत असेलेल्या चौघांना अटक

एमपीसी न्यूज – तलवार, कोयते, मिरची पूड घेऊन दरोड्याच्या तयारीत असेलेल्या चौघांना खडक पोलिसांनी अटक केली आहे. आंबाबाई देवीच्या मंदिराजवळ मंगळवारी (दि.08) पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली.

निखील विश्वास थोरात (वय 23, रा. लोहीयानगर, पुणे), द्वारकाधिश बाबासाहेब पवार (वय 23, रा. गंजपेठ, पुणे), सुरेश रमेश भिसे (वय 20, रा. गंजपेठ, पुणे) व आदित्य सुभाष लोंढे (रा. लोहीयानगर, पुणे) असे अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी टींबर मार्केट, पुणे येथील दुकानांवर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. त्यांच्या जवळ तलवार, कोयते, मिरची पूड, नायलॉन दोरी असे साहित्य मिळून आले. आंबाबाई देवीच्या मंदिराजवळ मंगळवारी (दि.08) पहाटे पाचच्या सुमारास खडक पोलिसांनी त्यांना अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.