Pune Crime News : कोंढव्यातून नायजेरियन व्यक्तीकडून चार लाखाचे कोकेन जप्त

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने कोंढव्यातून एका नायजेरियन व्यक्तीकडून तब्बल चार लाख रुपये किमतीचे कोकेन जप्त केले आहे.

शमशुद्दीन ओमोटोला हसन (वय 48, रा. सांकला एक्सक्लुझिव्ह विस्ता सोसायटी, पिसोळी, मूळ लॅगोस, नायजेरिया) असे आरोपीचे नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी कोंढवा परिसरात गस्त घालत असताना त्यांना वरील आरोपी संशयास्पद अवस्थेत आढळला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 52 ग्रॅम कोकेन हे अमली पदार्थ सापडले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

त्याच्या जवळील पाच मोबाईल फोन, एक दुचाकी, रोख 20 हजार रुपये आणि इलेक्ट्रिक वजन काटा असा एकूण पाच लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.