Pune Crime News : नेव्हीत वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगत फसवणूक

एमपीसी न्यूज – नेव्हीत असतानाचे वरिष्ठ सहकारी असल्याबाबतचा ईमेल पाठवून मुलगी आणि मी लॉस एंजलीस येथे अडकल्याचे सांगून एक लाख रुपये पाठविण्यास सांगून फसवणूक करणार्‍या असिफ अली अणि एका अनोळखी व्यक्ती विरोधात चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत इंडियन नेव्हीतील अधिकारी अरविंद के पुथिया (71, भोसले इन्क्लेव्ह, भोसलेनगर,पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्यासोबत इंडियन नेव्हीमध्ये नोकरीस असलेले त्यांचे वरिष्ठ अधिकारी जी. के. झंगयानी यांच्यानावाने फिर्यादींना ईमेल मिळाला.

त्यामध्ये अनोळखी आरोपींनी फिर्यादी यांना मी आणि माझी मुलगी लॉस एंजलीसमध्ये अडकलो आहे. भारतातील इतर माझे सोबतचे लोक कसे आहेत, असा भावनिक मेसेज पाठवला. त्याबरोबरच माझा मुंबईतील न्यायालयात मालमत्तेचा वाद सुरू आहे. त्यासाठी वकील असीफ आली याला एक लाख रूपये द्यायचे आहेत, असे सांगून भारतात आल्यावर पैसे देण्याचे आश्वासन आरोपीने दिले. त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपीने सांगितल्यानुसार एक लाख रूपये पाठविले. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत फिर्याद दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.