Pune Crime News : चलनातून बाद केलेल्या एक हजाराच्या नोटा दाखवून लाखोंची फसवणूक

एमपीसी न्यूज – चार वर्षापूर्वी सरकारने नोटबंदी करत चलनातून बाद केलेल्या 1000 रुपयांच्या नोटा दाखवून त्या बदलून देतो असे सांगत लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील एकाला पुणे पोलिसांनी जेरबंद केले.

अण्णासाहेब अर्जुन धायतिडक असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा लष्करातील कर्मचारी आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यात घेऊन भारतीय चलनातून बाद झालेल्या 1000 रुपयांच्या 56 नोटा भारतीय मनोरंजन बँक व 500 रुपया सारख्या दिसणाऱ्या बनावट नोटा, मोटार असा एकूण 27 लाख 35 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, दरोडा वाहनचोरी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी तानाजी कांबळे यांना आरोपी अण्णासाहेब हा जुन्या एक हजार रुपयांच्या बाद झालेल्या नोटा तसेच नकली नोटा बाळगून असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या रेंज हिल येथील घरावर शुक्रवारी छापा टाकला आणि या बनावट नोटा ताब्यात घेतल्या. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याची एक टोळीच कार्यरत असल्याचे उघडकीस आले.

ही टोळी एखादे सावज हेरून त्याला केंद्र सरकारचे बनावट अध्यादेश दाखवत. आमच्याकडे एक हजार रुपयांच्या बनावट नोटा असल्याचे सांगून ते एक व्हिडिओ दाखवत. या ग्रुप मध्ये ते बनावट नोटांचे बंडल आवर जुनी बाद झालेली नोट लावत असत. त्यानंतर त्यांना एखाद्या बँक वाल्याला शोधायला सांगत होते आणि फसवणूक करत होतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.