Pune Crime News : इंस्टाग्रामद्वारे संपर्क साधून मुंबईत फ्लॅट देतो असे सांगत 3.55 लाखांचा गंडा 

एमपीसी न्यूज – इंस्टाग्रामद्वारे संपर्क साधून मुंबईत फ्लॅट मिळवून देतो असे सांगत एका इसमाला 3.55 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना जानेवारी 2020 ते जून 2020 दरम्यान ऑनलाईन माध्यमातून घडली. 

याप्रकरणी 46 वर्षीय पुरुषानं ऑनलाईन माध्यमातून सायबर विभागाकडे तक्रार दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी इंस्टाग्राम खातेधारक, बॅंक खातेधारक व बाणेर येथील एका अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना अज्ञात इंस्टाग्राम खात्यावरुन मुलगी असल्याचे भासवून संपर्क केला. फिर्यादी यांच्याशी संवाद साधत मुंबईत फ्लॅट देतो असे सांगत डिपाॅझिट व आगाऊ घरभाड्यासाठी 3 लाख 55 हजार एवढी रक्कम खात्यावर जमा करून घेतली.

त्याबदल्यात फिर्यादीला कोणताही फ्लॅट न देता त्यांची फसवणूक केली. पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.