Pune Crime News : गणेश पेठेतील इमारत विक्री करण्याच्या बहाण्याने फसवणूक, 3 कोटीची खंडणीही मागितली

एमपीसी न्यूज – पुणे शहराच्या गणेश पेठेत असलेली एक चार मजली इमारत विकण्याच्या बहाण्याने 4 कोटी 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याशिवाय आरोपींनी आंदेकर व घिसाडी गँगची धमकी दाखवून 3 कोटींची खंडणी मागितल्याचे देखील उघड झाले आहे.

खडक पोलिसांनी याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. सर्व प्रकार 2016 ते 2021 या कालावधीत घडला आहे.

_MPC_DIR_MPU_II

रामचंद्र मुलतानी (वय 72) यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अशोक आत्माराम शर्मा, सीमा अशोक शर्मा व हेमंत आत्माराम शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यातील हेमंत शर्मा यांचा मृत्यू झालेला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी यांचे व्यापारी संबंध होते. अनेक वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात. गणेश पेठेतील 143.81 चौरस मीटर जागा व त्यावर उभी असलेली चार मजली इमारत विकण्याच्या बहाण्याने आरोपीं यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडुन या इमारतीपोटी वेळोवेळी 4 कोटी 80 लाख रुपये घेतले.

त्यानंतर त्यांना जागा आणि पैसे परत न देता त्यांची फसवणूक केली. शिवाय त्यांनाच आंदेकर व घिसाडी गॅंगची धमकी देत आणखी 3 कोटी रुपयांची खंडणी मागितली. अधिक तपास खडक पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.