Pune Crime News : तुझी मांजर माझ्या घरात आलीच कशी म्हणत दोन शेजारणीत फ्री स्टाइल हाणामारी

एमपीसी न्यूज- मांजर घरात शिरल्यावरून शेजाऱ्यांमध्ये (Pune Crime News) चांगलीच जुंपली. दोन महिलांमध्ये मांजरीवरून शिवीगाळ व मारहाण करण्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी पुण्यातील खडकीच्या कमलाबाई बहिरट चाळीत घडला. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी अदखल पात्र गुन्हे नोंद करण्यात आले.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 45 वर्षीय महिलेने मांजर पाळली आहे. त्यांची मांजर शेजारी राहणाऱ्या 24 वर्षीय महिलेच्या घरात शिरली होती. तक्रारदार या मांजरीला आणण्यासाठी गेल्या असता मांजरीवरून वाईट-वाईट शिवीगाळ केली व हाताने मारहाण केली.

Pune Crime News : डॉक्टर तुम्हीसुद्धा; व्याजाच्या पैशासाठी ठार मारण्याची धमकी देणाऱ्या डॉक्टर वर गुन्हा दाखल

तर, 24 वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, त्या दारात कपडे धुत असताना महिला तिच्या मांजरीला शिव्या देत होती. पण, त्या आपल्यालाच घालून पाडून शिव्या देत असल्याचा गैरसमज झाला. त्यावरून (Pune Crime News) त्यांच्यात वाद झाले व त्यांनी 24 वर्षीय महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.