Pune Crime News : अपहरणाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी 27 वर्षांनंतर जेरबंद

एमपीसीन्यूज : कोथरुड पोलिस ठाण्यात 1993 साली एक अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी मागील 27 वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता. तो सापडत नसल्यामुळे न्यायालयानेही त्याला फरार घोषित केले होते. दरम्यान, तब्बल सत्तावीस वर्षानंतर या गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

रामजी सेवालाल कनोजिया उर्फ धोबी (वय 50) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकातील कर्मचारी धनंजय ताजने आणि मॅगी जाधव यांना सत्तावीस वर्षापासून फरार असलेला रामजी कनोजिया उर्फ धोबी हा मुंबई येथे स्वतःची ओळख लपवून राहत असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुणे पोलिसांच्या एका पथकाने मुंबईतील ओम साईनाथ चाळ, कांदिवली येथून आरोपीला अटक केली. आरोपी सध्या सुरक्षा रक्षकाचे काम करत होता. 23 वर्षाचा असताना त्याने कोथरूड पोलिस स्टेशनच्या हद्दीत अपहरणाचा गुन्हा केला होता.

त्यानंतर तब्बल 27 वर्षे तो फरार होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक करून पुढील तपासासाठी कोथरूड पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.