Pune Crime News : मोक्कातील फरारी गुन्हेगारास अटक

एमपीसी न्यूज – खूनाचा प्रयत्नातील आणि फरार असलेल्या आंदेकर टोळीतील एका आरोपीला पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. अक्षय अकोलकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

याबाबतची माहिती अशी की – आंदेकर टोळीतील अक्षय अकोलकर व त्याच्या साथीदाराने फिर्यादी व त्यांचे पती यांना काळेपडळ भागात जाऊन हातात कोयता घेऊन तो हवेत फिरवून मला उसने पैसे मागतो का, मी तुरुंगात असताना माझ्या घरी जाऊन घरच्यांना त्रास देतो काय असे म्हणून ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने डोक्यात वार केले होते.

 

अक्षय अकोलकरवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो तेव्हापासून फरार होता. मात्र पोलिसांना खबरीकडून तो नाना पेठेतील एका वाड्यात एकटाच रहात असल्याची माहिती मिळाली होती.त्यानंतर पोलीसांनी त्याला नाना पेठेत जाऊन तो रहात असलेल्या वाड्यास चारी बाजूने घेरले. त्यानंतर अकोलकर रहात असलेल्या खोलीवर पोलीसांनी छापा टाकून त्याला अटक केली.

 

अक्षय अकोलकरकडे सखोल चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. अक्षय हा आंदेकर टोळीत सक्रीय असून त्याच्यावर एक खून, तीन खूनाचा प्रयत्न, एक खंडणी, दोन जबरी दुखापत,चार तडीपार आदेशाचा भंग अशा प्रकारचे एकूण 13 गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.