Pune Crime News : खुनाचा प्रयत्न करून दोन वर्षांपासून फरार असलेल्या एकाला अटक

एमपीसी न्यूज – तरुणाच्या आईचा खुनाचा प्रयत्न करून मागील दोन वर्षांपासून फरार असलेल्या एकाला गुन्हे शाखेने अटक केले. सागर अशोक ढोकळे (वय 30, रा. सुतारदरा, कोथरूड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

भोर तालुक्यातील किकवी ग्रामदेवताच्या छबिना मिरवणूकीवेळी झालेल्या भांडणातून आरोपी सागरने अवधूत दिलीप भोसले याच्या आईवर तलवारीने वार करून गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान गुन्हे शाखेचे कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, दोन वर्षांपासून फरार असलेला सागर ढोकळे सुतारदरा परिसरात येणार असल्याची माहिती सचिन गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून सागरला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला गुन्हे शाखेने राजगड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, सचिन गायकवाड, विल्सन डिसोझा, मच्छिंद्र वाळके यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.