Pune Crime News : पोलिसांवर हल्ला करुन फरार झालेल्या अट्टल दरोडेखोरास अटक

एमपीसी न्यूज – कोथरूड येथील एका सोसायटीत दरोडा टाकून पोलिसांवर हल्ला करुन फरार झालेल्या अट्टल दरोडेखोरास हडपसर पोलिसांनी जेरबंद केले आहे. मंगळवारी (दि.06) हडपसर परिसरात ही कारवाई करण्यात आली.

सोमनाथ नामदेव घारुळे (वय 24, वर्षे रा. बिराजदार नगर, हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक आरोपी आणि इतर पाच जणांनी कोथरूड मधील पंचरत्न सोसायटीत दरोडा टाकला. पोलिसांनी याठिकाणी तात्काळ धाव घेऊन आरोपींना ताब्यात घेतले मात्र, सोमनाथ नामदेव घारुळे हा आरोपी पोलिसांवर हल्ला करुन फरार झाला होता. दरम्यान मंगळवारी (दि.06) हा आरोपी बिराजदार नगर, हडपसर या परिसरात फिरत चोरीच्या दुचाकीवरून फिरत असल्याची माहिती हडपसर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ याठिकाणी सापळा रचून त्याला अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.