Pune Crime News ; गजा मारणेची नागपूर जेल, निलेश घायवळची अमरावती कारागृहात रवानगी

एमपीसीन्यूज : येरवडा कारागृहात एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध असलेल्या मारणे टोळीचा प्रमुख गजा उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे आणि घायवळ टोळी प्रमुख निलेश बन्सीलाल घायवळ या दोघांनाही येरवडा कारागृहातून वेगवेगळ्या कारागृहात हलवण्यात आले आहे. गजा मारण्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात, तर निलेश घायवळ यांची अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका झाल्यानंतर गजा मारणे याने पोलिसांना आव्हान देत मिरवणूक काढली होती. त्यानंतर त्याच्या विरोधात पुणे, पिंपरी चिंचवड, आणि पुणे ग्रामीण पोलिसात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर फरार झालेल्या गजा मारणे याला सातारा पोलिसांनी अटक केली होती. एक वर्षासाठी त्याची रवानगी कायद्याअंतर्गत येरवडा कारागृहात करण्यात आली होती.

तर घायवळ टोळीचा म्होरक्या निलेश घायवळ यालाही अपहरण आणि खंडणी प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यालाही एमपीडीए कायद्यांतर्गत येरवडा मध्यवर्ती कारागृह स्थानबद्ध करण्यात आले होते. सुरक्षिततेच्या कारणास्तव या दोघांनाही नागपूर आणि अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.