Pune Crime News : कोथरूड येथे नववर्ष स्वागताला गालबोट; गाड्यांची तोडफोड अन् जाळपोळ

एमपीसीन्यूज : एकीकडे नववर्षाचे स्वागत होत असताना पुण्यातील कोथरूड परिसरात मात्र एका टोळक्याने गाड्यांची तोडफोड अन् जाळपोळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोथरूड परिसरातील सुतारदरा परिसरात दोन दुचाकींचा जाळपोळ करण्यात आली तर काही चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सुतारदरातील शिवशक्ती नगर येथे टोळक्याकडून एक शाळेचे व्हॅन, दुचाकी आणि आणखी काही चार चाकी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली. तसेच तीक्ष्ण हत्याराने वार करून अनेक दुचाकी वाहनांचे नुकसान केले.

परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी अशा घटना सुतारदरा परिसरात वारंवार होत असतात.

वारंवार होणाऱ्या अशा घटना यामुळे सुतारदरा येथील स्थानिक नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी या ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.