Pune crime News : लुटमार करण्याच्या तयारीतील सराईत टोळी अटकेत

एमपीसीन्यूज : ट्रकचालकांची लुटमार करण्याच्या तयारीत असलेल्या सराईत टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून कोयते, मोबाईल असा 37 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई कात्रज येथील नवीन बोगद्याच्या अलीकडे काल, गुरुवारी मध्यरात्री करण्यात आली.

आकाश भरत थोरात (वय 24), सचिन आप्पा रणदिवे (वय 30) ओंकार भाउसाहेब रणदिवे (वय 22, तिघेही रा. आंबेगाव खुर्द), तुषार आनंदा दुधाणे ( वय 20, रा. कात्रज) , तनिष्क संतोष सोनवणे (वय 18 रा. कात्रज ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी कात्रज नवीन बोगद्याच्या अलीकडे पाचजण संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती कर्मचारी शंकर कुंभार आणि जगदीश खेडकर यांना मिळाली.

संबंधित टोळीकडे शस्त्रास्त्रे असून ते ट्रकचालकांना लुटण्याच्या तयारीत असल्याचेही पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी दोन पथके तयार करुन पाचजणांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून कोयते, मोबाइल जप्त करण्यात आले.

अधिक चौकशीत संपुर्ण टोळी सराइत असून त्यांच्याविरुद्ध खून, खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.