Pune Crime News : पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक

एमपीसीन्यूज : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला कोथरूड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन दुचाकी, घातक शस्त्रे जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई डुक्कर खिंडीच्या जवळील उरितनगर परिसरात करण्यात आली.

समीर अंकुश पासरलकर (वय २३, रा. केळेवाडी, कोथरूड), प्रमोद बळीराम साठे (वय २९, रा. बालगुडी, मुळशी), ऋषीकेश राजेंद्र ठाकुर ( वय २१ मातरवाडी, मुळशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलीस नाईक विजय कांबळे यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड पोलिस पेट्रोलिंग करीत असताना डुक्कर खिंडीच्या जवळील उरितनगर टेकडीलगत असलेल्या एका पेट्रोलपंप परिसरात टोळक्याची संशयास्पद हालचाल पोलिसांना दिसून आली.

त्यानुसार पोलिसांनी समीर, प्रमोद, ऋषीकेशला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे घातक शस्त्रे आणि दोन दुचाकी मिळून आल्या.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.