गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

Pune Crime News : दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

एमपीसी न्यूज – कुंजीरवाडी येथे पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला लोणी काळभोर पोलिसांनी (Pune Crime News) अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी मंगळवारी (दि.24) रात्री केली.

 

प्रेम राजू लोंढे (वय 19 रा.आळंदी रोड), ऋषीकेश उत्तम लोंढे (वय 26रा.पानमळा), गणेश भगवान खलसे (वय 22 रा.कुंजीरवाडी) तानाजी भाऊसाहेब गावडे (वय 23 रा.कुंजीरवाडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर त्यांचे दोन साथीदार पळून गेले.

Pimpri News : भारत विकास परिषदतर्फे हिवाळी आरोग्य तपासणी शिबिर

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री गस्त घालत असताना बीट मार्शल यांना खबर मिळाली की, सात आठ जण शस्त्रासह म्हातोबा आळंदी रेल्वे ब्रीजजवळ थांबले आहेत.पोलिसांनी तातडीने इतर पथकाला बोलावून आरोपींना पाठलाग करून पकडले त्यातील चार जण ताब्यात आले तर अंधाराचा फायदा घेऊन दोन जण पळून गेले. ताब्यात असलेल्या आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 2 लोखंडी पालघन, मिरची पूड, बॅटरी, नायलॉन दोरी, चिकटपट्टी असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

 

त्यांनी सांगितले की, आरोपी हे मिळून कुंजीरवाडी येथील ऑटो कॉर्नर एच.पी. पेट्रोल पंप येथे दरोडा टाकण्यासाठी जाणार होते हे कबूल केले. लोणी काळभोर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे करत आहेत.

Latest news
Related news