Pune Crime News : वानवडीत दहशत माजविणारी टोळी अटकेत

एमपीसी न्यूज – वानवडी भागात वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविणाऱ्या ( Pune Crime News) टोळक्याला पोलिसांनी अटक केली. पीयूष उर्फ अमन राजेश मरोटे (वय 20), सिद्धार्थ अनिल काकडे (वय 21, दोघे रा. वानवडी), आदित्य सुनील पिवळ (वय 19 , रा. खडकी), हितेन रवींद्र यादव (वय 19 , रा. आझम कॅम्पसजवळ, लष्कर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

 

Mp Shrirang Barne : मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळणार

 

वानवडी भागात दहशत माजविण्यासाठी मरोटे, काकडे, पिवळ, यादव यांनी वाहनांची तोडफोड केली होती. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले होते. आरोपी रेसकोर्स परिसरातील एम्प्रेस गार्डनजवळ थांबल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून चौघांना अटक केली.

 

 

पोलीस आयुक्त विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त पौर्णिमा तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप शिवले, उपनिरीक्षक अजय भोसले, अमजद पठाण, संतोष नाईक, विनोद भंडलकर, अतुल ( Pune Crime News) गायकवाड आदींनी ही कारवाई केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.