Pune Crime News : गुंड गजानन मारणेची जामिनावर सुटका

रॅली काढल्याप्रकरणी केली होती अटक

एमपीसीन्यूज : कुख्यात गुंड गजानन मारणे आणि त्याच्या नऊ साथीदारांची जामीनावर सुटका करण्यात आली. खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका झाल्यानंतर गजानन मारणे याने साथीदारांसह मिरवणूक काढत कोथरूड पोलिसांच्या हद्दीत बेकायदेशीर गर्दी जमली होती. त्यानंतर कोथरूड पोलिसांनी 8 समर्थकांसह त्याला अटक केली होती.

त्या सर्वांना आज न्यायालयात हजर केले असता या सर्वांना जामीन देण्यात आला.

गजानन मारणे, प्रदीप दत्तात्रय कंधारे (वय 36), बापु श्रीमंत बागल (वय 34), आनंता ज्ञानोबा कदम (वय 37), गणेश नामदेव हुंडारे (39), रुपेश कृष्णराव मारणे (वय 38), सुनील नामदेव बनसोडे (वय 40) श्रीकांत संभाजी पवार (वय 34) आणि सचिन आप्पा ताकवले (वय 32) अशी जामीन मिळालेल्या नऊ जणांची नावे आहेत.

तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर गजानन मारणे याने मुंबई-पुणे महामार्गावरून शेकडो समर्थकांसह अलिशान वाहनातून मिरवणूक काढली होती. त्याशिवाय कोथरूड परिसरातही फटाके वाजवून, जमाबंदी आदेशाचे उल्लंघन करीत बेकायदेशीर जमाव जमवून दहशतीचे वातावरण तयार केले.

या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात दीडशे ते दोनशे जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच गजा मारणेसह नऊ जणांना अटक केली होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.