Pune Crime News : कुख्यात गुंड शरद मोहोळसह पाच जणांची जामिनावर सुटका

एमपीसीन्यूज : खुनाच्या गुन्ह्यातून येरवडा कारागृहातून निर्दोष सुटका झाल्यानंतर शहरात आपली व आपल्या गॅंगची पूर्वीप्रमाणेच दहशत राहावी यासाठी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केलेल्या गॅंगस्टर शरद मोहोळसह पाच जणांना आज जमीन मंजूर करण्यात आला.

शरद मोहोळ आणि त्याच्या साथीदारांना आज पुणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी वकिलांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. न्यायालयाने ती अमान्य करत न्यायालयीन कोठडी सुनावली. शरद मोहोळ याच्या वकिलांनी लागलीच जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना जामीन मिळाला.

26 जानेवारी रोजी खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत पतित-पावन संघटनेच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गॅंगस्टर शरद मोहोळ आणि त्याचे दहा ते बारा साथीदार त्या ठिकाणी आले होते.

Covid-19 अनुषंगाने जमाबंदी आदेश असतानाही आरोपींनी बेकायदेशीर गर्दी जमवून आरडाओरडा करत गुरुवार पेठेत दहशत निर्माण केली होती. या प्रकरणी खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.