Lonikand Crime News : गॅस चोरीचा पर्दाफाश; एजन्सीचे सहा कर्मचारी अटकेत

पोलिसांनी 194 गॅस सिलेंडरसह पाच गाड्या जप्त केल्या.

एमपीसीन्यूज : ग्राहकांना देण्यात येणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस काढून कमर्शियल सिलेंडर मध्ये भरून त्याची विक्री करणाऱ्या सहा जणांना लोणीकंद पोलिसांनी अटक केली. यावेळी पोलिसांनी 194 गॅस सिलेंडरसह पाच गाड्या जप्त केल्या आहेत. याची किंमत 13 लाख 58 हजार रुपये इतकी आहे.

सुनील जगाराम बिष्णोई, राजेश श्रीराम बिष्णोई, कैलास बाबुराव बिष्णोई, श्रावण बिष्णोई, कैलास बिष्णोई अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलिसांना काही व्यक्ती अनधिकृतरित्या गॅस सिलेंडरची रिफिलिंग करत असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता सहा व्यक्ती घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस काढून तो कमर्शिअल गॅस सिलिंडरमध्ये भरत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी या सहाही जणांना ताब्यात घेतले.

‘ मागील अनेक दिवसांपासून लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीतीलवाघोली परिसरात घरगुती गॅस कमी येत असल्याबाबत अनेक तक्रारी येत होत्या. या कारवाई मुळे गॅस चोरीची मोठी टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. प्रताप मानकर- पोलिस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.