Pune crime News : पुणे विमानतळावर सोन्याची तस्करी; दुबईहून आलेल्या प्रवाशाकडून साडेसात लाखांचे सोने जप्त

एमपीसीन्यूज : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोन्याच्या तस्करीचा डाव हाणून पाडला. गुरुवारी दुबईहून आलेल्या एका विमानातील प्रवाशांकडून 152 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. या सोन्याची किंमत सात लाख 90 हजार रुपये आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गुरुवारी दुबईहून पुणे विमानतळावर एक आंतरराष्ट्रीय फ्लाईट आली. विमानातून काही प्रवासी उतरले.

यातील एक प्रवासी विमानतळाबाहेर जात असताना सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी त्याच्याजवळील बॅग तपासली असता बॅगच्या खालच्या भागात सोने लपवून ठेवल्याचे उघडकीस आले.

हे लपविलेले 152 ग्रॅम सोने सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले. त्याची किंमत सात लाख 90 हजार रुपये इतकी आहे. या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडे अधिक चौकशी सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.