Pune Crime News : गुंड शरद मोहोळची दोन महिन्यासाठी पुणे शहरातून हकालपट्टटी

एमपीसी न्यूज – कोरोना नियमावलीचे उल्लंघन करीत साथीदारांसह एका कार्यक्रमात उपस्थित राहताना आरडाओरडा करीत परिसरात दशहत माजविण्याऱ्या  गँगस्टर शरद मोहोळ (रा. सुतारदरा, कोथरूड) याला पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत प्रवेश करण्यासह राहण्यास दोन महिन्यांची मनाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

गुरूवार पेठ परिसरात 26 जानेवारीला एका संघटनेच्या कार्यक्रमानिमित्त गँगस्टर शरद मोहोळ आणि त्याचे 10 ते 12 साथीदार आरडाओरडा करीत हजर झाले होते. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेले इतर नागरिक भीतीने पळून गेले होते. कोरोना कालावधीतही नियमांचे पालन न करता मोहोळ टोळीने परिसरात दहशत निर्माण केली.

त्यामुळे त्याच्यासह साथीदारांविरूद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून 16 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्याविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचा आदेश खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार गँगस्टर शरद मोहोळ याला शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करणे आणि राहण्यावर दोन महिने सक्त मनाई करण्याचा आदेश 4 मार्चला पारित करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.