Pune Crime News : गुजरात बॉम्बस्फोटातील आरोपी तब्बल पंधरा वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात, वानवडीतून केली अटक

एमपीसी न्यूज – गुजरातच्या कालूपूर मध्ये 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोटातील एका आरोपीला गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यातील वानवडी परिसरातून अटक केली.

मोहसीन पूनावाला असे या आरोपीचे नाव आहे. बॉम्बस्फोट झाल्यापासून तो फरार होता. मंगळवारी रात्री उशिरा त्यांना पुणे पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली.

गुजरातच्या कालुपुर रेल्वे स्टेशन वर 19 फेब्रुवारी 2006 रोजी भीषण बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये अनेक नागरिक जखमी झाले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा आतापर्यंत 12 आरोपींना अटक केली आहे तर मोहसीन पूनावाला हा तेरावा आरोपी आहे. यातील दहा आरोपींचा अजूनही शोध सुरू आहे. हे सर्व आरोपी लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे.

सोळा वर्षे फरार असलेला अब्दुल गाजी दहशतवादविरोधी पथकाच्या हाती लागल्यानंतर मोहसिन ची माहिती पुढे आली होती. त्यानंतर गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली. मोहसिन हा पुण्यात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती. परंतु पोलिसांना चकवा देण्यासाठी तो सातत्याने घरे बंद होता. अखेर मंगळवारी रात्री त्याला अटक करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.