Pune Crime News : गुटखा विक्रेते पोलिसांच्या रडारवर, 29 जणांविरूद्ध कारवाई, 12 लाखांचा ऐवज जप्त

एमपीसीन्यूज : पुणे शहरातील विविध भागात अवैध गुटखाविक्री आणि वाहतूक करणा-यांविरूद्ध पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी जोरदार मोहिम राबविली आहे. त्यामुळे अवैध गुटखाविक्री करणा-यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईत 33 पथकांची स्थापना करून आतापर्यंत 29  जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे.

त्यांच्याकडून 12 लाख 27  हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये गुटखा, सिगारेट, वाहनांचा समावेश आहे.

गुटखाविक्रीला बंदी असतानाही शहरात विक्री आणि वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांना दिसून आले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी 33 पथकांची स्थापना करून गुटखाविक्री करणा-यांची शोधमोहिम राबविली.

त्यानुसार 23  जणांवर गुन्हे दाखल करीत 29  जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली.

शहरातील अवैध गुटखाविक्रीचा बिमोड करून कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.