Pune Crime News : पुण्यातील गुटख्याचे कनेक्शन थेट गुजरातमध्ये, गुजरातमधून जप्त केला पंधरा लाखाचा गुटखा 

एमपीसी न्यूज : मागील काही दिवसांपासून पुणे पोलिसांनी शहरातून मोठ्या प्रमाणात गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. या गुटख्याचे कनेक्शन थेट गुजरात पर्यंत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांच्या एका पथकाने गुजरात राज्यातील सिल्वसा येथे गुटखा तयार करणाऱ्या कंपनीवर छापा टाकून तब्बल 15 कोटी रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. या कारवाईमुळे गुजरात अन राज्यात व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र याप्रकरणात अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नसून त्यांची नावे निष्पन्न झाले आहेत. यात ते फरार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पुणे पोलिसांनी 17 डिसेंम्बर रोजी चंदननगर परिसरात छापे मारी करत सुरेश अग्रवाल, अक्षय सुरेश अग्रवाल, आकाश सुरेश अग्रवाल, नीरज मुकेश सिंगल, प्रवीण मुकुंद वाहुळ यांच्यावर छापमारी करत साडे सात लाख रुपयांचा गुटखा जप्त केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचा तपास गुन्हे शाखेचे युनिट चारचे पथक करत होते.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल आणि त्यांचे पथक आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू असताना गुटख्यात हवाला मार्फत पैसे देवाण घेवाण होत असल्याची माहिती समोर आली. यानंतर पोलिसांनी छापे टाकत फरासखाना व विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली होती. यावेळी 9 जणांना पकडण्यात आले होते. तर 4 कोटींच्या जवळपास रोकड पकडली होती. यावेळी एकाच वेळी वेगवेगळ्या 5 ठिकाणी छापे टाकले होते. यानंतर हडपसर आणि वानवडी येथे देखील छापे टाकत चौघांना अटक केली. त्यात 25 लाख रुपयांचा गुटखा पकडला होता. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर गुटखा कनेक्शन हे गुजरातमधील वापी व सिल्वासा येथे असल्याचे समजले होते.

त्यानुसार सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, उपनिरीक्षक जयदीप पाटील, कर्मचारी राजेश शेख, सचिन ढवळे, कौस्तुभ जाधव, शीतल शिंदे यांच्या पथकाने या दोन ठिकाणी छापे मारी करत तबल 15 कोटी रुपयांचा “गोवा” गुटखा आणि इतर गुटखा पकडला आहे. कारवाईत मात्र पोलिसांना आरोपी सापडले नाहीत. ते फरार झाले असून, त्यांची नावे निष्पन्न झाले आहेत, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.