Pune Crime News : मध्यरात्री कामावरून घरी निघालेल्या महिलेचा पाठलाग करून विनयभंग

एमपीसीन्यूज : मध्यरात्री काम आटोपल्यानंतर दुचाकीने घरी निघालेल्या एका महिलेचा अनोख्या व्यक्तीने पाठलाग करत तिचा विनयभंग केला. मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली.

याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आपले काम आटोपल्यानंतर पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास ही महिला दुचाकीने घराकडे निघाली होती. त्यावेळी एका दुचाकी चालकाने त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आपला कोणीतरी पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित महिलेने दुचाकी जोरात चालवली.

दरम्यान, या नादात एका गतिरोधक आवरून दुचाकी आदळली आणि ही महिला दुचाकीसह खाली पडली.

त्यानंतर आरोपी ही त्या ठिकाणी आला आणि त्याने फिर्यादी महिलेचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी आरडाओरडा केल्याने आरोपी तेथून पसार झाला. यानंतर त्या खूपच घाबरलेल्या अवस्थेत सोसायटीच्या आत शिरल्या आणि कुटुंबाला माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.

अधिक तपास मुंढवा पोलीस करत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.