Pune Crime News : मित्राच्या वाढदिवसाचा केक कापण्यासाठी ‘तो’ तलवार घेऊन आला होता, पण…

एमपीसी न्यूज – मित्राचा वाढदिवसाचा केक कापण्यासाठी एक 22 वर्षीय तरुण तलवार घेऊन आला होता. परंतु पोलिसांनी त्या आधीच या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ही तलवार जप्त केली आहे.

अरबाज आमिर खान (वय 22, लोहिया नगर पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. खडक पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पोलीस अंमलदार अमोल पवार व इम्रान शेख हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना अरबाज खान हा मित्राच्या वाढदिवसाचा केक कापण्यासाठी तलवार घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखा एकच्या पथकाने लोहियानगर येथील जय जवान मित्रमंडळ जवळून त्याला ताब्यात घेतले. यावेळी तो तलवार घेऊन परिसरात फिरत होता. शर्टच्या आत त्याने तलवार लपवली होती. पोलिसांनी त्याची झडती घेऊन ती तलवार जप्त केली.

दरम्यान अशाप्रकारे रात्री-अपरात्री चौकामध्ये गर्दी करून जर कोणी वाढदिवस साजरा करत असेल, वाढदिवसाचा केक कापण्यासाठी तलवार, कोयता यासारख्या हत्यारांचा वापर करत असेल अशा लोकांवर गुन्हे शाखेचे पोलीस लक्ष ठेवून असून त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.