Pune Crime News : सदाशिव पेठेत घरफोडी, सव्वा लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – शहरातील मध्यवर्ती सदाशिव पेठेतील एका फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील 1 लाख 30 हजारांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले.

ही घटना काल पहाटे तीन ते पाच वाजण्याच्या सुमारास नागनाथ पार परिसरातील गंधाली सोसायटीत घडली. याप्रकरणी प्रसाद जोशी (वय 53) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रसाद कुटुंबियासह गंधाली सोसायटीत राहायला आहेत. कामानिमित्त ते बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, चार चांदीची ताटे असा मिळून 1 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सरडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.