Pune Crime News : हॉस्पिटलमधील नर्सचा विनयभंग, डॉ. प्रसाद जोगदंड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका नर्सचा डॉक्टरांनीच विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला (Pune Crime News ) आहे. हडपसर परिसरातील भेकराईनगरमध्ये 21 जानेवारी रोजी हा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी डॉ. प्रसाद जोगदंड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 34 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी या नर्स असून डॉक्टर जोगदंड यांच्या हॉस्पिटलमध्ये त्या 2016 मध्ये नोकरीस होत्या. दरम्यान 21 जानेवारी ते 23 जानेवारी या कालावधीत डॉक्टर जोगदंड यांनी फिर्यादी यांना मेसेज करून “तू झोपली का, कोठे आहे, आपण बाहेर जाऊ, सकाळी परत येऊ” असे मेसेज केले.

Pune Crime News : ब्लॅकमेल करत मित्राच्या पत्नीवर बलात्कार

तसेच फिर्यादी यांना वारंवार फोन करून त्यांच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. सतत पाठलाग करून विनयभंग केला आणि फिर्यादी यांच्या मुलाबद्दल अश्लील आणि घाणेरडे मेसेज करून फिर्यादी यांच्या मनात लज्जा उत्पन्न केल्याचे तक्रारीत म्हटले (Pune Crime News )आहे. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.