Pune Crime News : किरकोळ कारणावरून टोळक्याची पती-पत्नीला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : सोसायटीसमोर उभी केलेली रिक्षा बाजूला न घेतल्यामुळे फोटो काढण्याचा प्रयत्न करणा-या महिलेसह पतीला सहा ते सात जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. ही घटना दोन दिवसांपूर्वी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गोखलेनगरमधील जनवाडीत घडली.

याप्रकरणी रत्ना रानडे (वय 34, रा. जनवाडी) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहा ते आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास रत्ना पतीसह सहकारनगरला चालल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या सोसायटीसमोर रिक्षा उभी करण्यात आली होती.

त्यामुळे रत्ना यांनी त्यांना रिक्षा बाजूला घेण्यास सांगत फोटो काढण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्यामुळे टोळक्याने रत्ना यांच्या हातातील आयपॅड फोडून त्यांच्यासह पतीला मारहाण केली.

याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1