Pune Crime News : क्षुल्लक कारणावरून पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज – “तुम्ही रोज एवढ्या रात्री सारखे कोणाशी चॅटिंग करता आमच्याशी का नाही बोलत” अशी विचारणा करणाऱ्या पत्नीला आणि मुलाला आरोपीने बेदम मारहाण केली.

बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विघ्नहरनगर मध्ये शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. एका 34 वर्षीय महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली असून पोलिसांनी या प्रकरणी कुणाल शेखर चांदेकर (वय 35) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी हे पती-पत्नी आहेत. शुक्रवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कुणाल चांदेकर हे मोबाईल वरुन चॅटिंग करत होते. यावेळी फिर्यादी यांनी “तुम्ही रोज एवढ्या रात्री सारखे कोणाशी चॅटिंग, करता आमच्याशी का नाही बोलत” अशी विचारणा केली.

याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करून कमरेच्या पट्ट्याने वायर ने लाकडी बांबूने मारहाण करून जखमी केले. तसेच त्यांना मारून टाकण्याची धमकी दिली. फिर्यादी यांचा मुलगा भांडण सोडण्यास मध्ये आला असता आरोपीने त्यालासुद्धा शिवीगाळ करुन मारुन टाकण्याची धमकी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.