Pune Crime News : स्वयंपाक नीट येत नसल्याचे सांगून पतीकडून छळ, फिनेल पिऊन पत्नीची आत्महत्या

एमपीसी न्यूज – स्वयंपाक नीट येत नसल्यामुळे पतीकडून सतत होणाऱ्या छळाला कंटाळून एका विवाहितेने फिनाईल पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला.

भाविका विलास झोरे (वय 34, रा. कोथरुड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. शहरातील कोथरूड परिसरात हा प्रकार घडला.

याप्रकरणी मयत विवाहितेची आई शांती पिंगळे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विलास झोरे याच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, दहा वर्षांपूर्वी विलास व भाविका यांचा विवाह झाला आहे. त्यांना तीन मूल आहेत. कोथरूड परिसरातील रामबाग कॉलनीत ते कुटुंबासह राहत होते. पती विलास झोरे हे भाविक याना काम नीट येत नाही, स्वयंपाक येत नाही असे टोमणे मारून त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असत. या त्रासाला कंटाळून भाविका यांनी फिनेल पिऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील या करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.