Pune Crime News : बंदुकीचा धाक दाखवून पतीने अपहरण करून बलात्कार केला, पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पतीने बंदुकीचा धाक दाखवून कारमधून अपहरण केले आणि केसेस मागे घेण्यासाठी धमकी देऊन बलात्कार केल्याचा आरोप पत्नीने केला आहे.

यानंतर पती विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे शहरातील कात्रज परिसरात हा प्रकार घडला. 31 वर्षीय महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पाच ते सहा वर्षापूर्वी फिर्यादी महिलेचे दुसरे लग्न झाले आहे. परंतु पती-पत्नी दोघांतही काही कारणावरून वाद होते. याच कारणावरून पतीने बंदुकीचा धाक दाखवून एकेदिवशी पत्नीचे अपहरण केले. तिला चारचाकी गाडीत बसवून एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. त्यानंतर केसेस मागे घे अन्यथा संपवून टाकेल अशी धमकी देत तिच्यावर बलात्कार केला.

फिर्यादी महिलेने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.