Pune Crime News : पती म्हणावे की हैवान! पत्नीला परपुरुषासोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले

एमपीसी न्यूज – पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नीला आपल्या 2 मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. मित्र संबंध ठेवत असताना पती मात्र स्वतः हे सर्व समोर उभा राहून पाहत होता. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी पती आणि त्याच्या दोन मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 48 वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने फिर्यादी महिलेला वेळोवेळी मानसिक त्रास दिला. तसेच तिची इच्छा नसतानाही डिसेंबर 2020 मध्ये हडपसर येथील एका लॉजवर एका मित्रांबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर जुलै 2021 मध्ये कोरेगाव पार्क परिसरातील एका फ्लॅटवर आणखी एका मित्रांसोबत पत्नीला अनैसर्गिक शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. आणि हे सर्व होत असताना आरोपी स्वतः त्या ठिकाणी उभा राहून हे सर्व पाहत होता.

 

या सर्व प्रकरणानंतर फिर्यादी महिलेने आज अखेर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पतीसह त्याचा दोन मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.