Pune Crime News : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काढला काटा, कोरोनाने मेल्याचा केला बनाव

एमपीसी न्यूज – अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने झोपेच्या गोळ्या देऊन नंतर गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे पतीचा मृत्यू कोरोनाने झाल्याचा बनाव या महिलेने केला. 23 मे रोजी उरूळीदेवाची, हवेली याठिकाणी हा प्रकार घडला. पोलिसांनी आरोपी पत्नी व प्रियकराला ताब्यात घेतले आहे.

मनोहर नामदेव हांडे, (रा. उरूळीदेवाची, हवेली जि.पुणे) असे मृत पतीचे नाव आहे. पत्नी आश्विनी मनोहर हांडे व प्रियकर गौरव मंगेश सुतार असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर हांडे यांची पत्नी आश्विनी हांडे हिने पती कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे सांगितले होते. याबाबत लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली. याबाबत समांतर तपास लोणीकाळभोर पोलीस करीत असताना शुक्रवारी (दि.4) मनोहर हांडे यांच्या मृत्यूबाबत साशंकता असल्याची माहीती मिळाली.

वरीष्ठ पोलिसांनी अधिक तपासाचे आदेश दिले त्यानुसार तपासात मनोहर यांची पत्नी आश्विनी मनोहर हांडे हिचे गौरव मंगेश सुतार (रा. उत्तमनगर, मंतरवाडी ता. हवेली) याच्याशी विवाहबाह्य अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. तपास पथकाने गौरव सुतार व आश्विनी हांडे यांचेवर पाळत ठेऊन व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे प्रथम गौरव सुतार यांस ताब्यात घेऊन तपास केला. आश्विनी हांडे हिच्या सोबत मिळुन मनोहर हांडे यांना सुरुवातीला झोपेच्या गोळया देऊन बेशुद्ध केले व नंतर त्याचे तोंड व गळा दाबुन खून केल्याचे आरोपी गौरव याने कबुल केले.

पोलिसांनी आश्विनी हांडे हिला ताब्यात घेऊन अधिक तपास केल्यावर, गौरव सुतार यांच्या सोबत दोन वर्षापासून प्रेमसंबंध असून याबाबत पती मनोहर याला समजले होते. तसेच, मनोहर हा कोरोना पॉझिटीव्ह असल्याने सुमारे पंधरा दिवसांपासून घरीच राहुन उपचार घेत असल्याने गौरव व आश्विनी यांच्या अनैतिक संबंधास अडसर ठरत होता. त्यामुळे गौरव व आश्विनी यांनी मनोहर याचा खून करून तो कोरोनाने मेल्याचा बनाव करण्याचा कट रचला.

त्याप्रमाणे 23 मे रोजीच्या रात्री गौरवने आश्विनीला झोपेच्या गोळ्या आणुन दिल्या आश्विनीने त्या गोळया मनोहरला दुधातून दिल्या. मनोहर झोपल्याची खात्री झाल्यावर गौरव याने मनोहरच्या घरी जाऊन आश्विनी व गौरव या दोघांनी मिळुन मनोहर याचा तोंड व गळा दाबुन खून केला. त्यानंतर गौरव तेथुन निघुन गेला व आश्विनी हिने वरील मजल्यावर राहणारी तिचे आईस मनोहर हा झोपेतून उठत नाही असे सांगुन तो झोपेतच कोरोना आजाराने मेला असल्याचा बनाव करून पोलिसांना देखील मनोहरचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले.

तपासात कोणताही पुरावा उपलब्ध नसताना फक्त मिळाले बातमीच्या आधारे पोलिसांनी कौशल्याने तपास करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. व संशयीत आरोपी गौरव मंगेश सुतार व आश्विनी मनोहर हांडे यांना अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.