Pune Crime News : घरगुती सिलेंडरमधील गॅस व्यावसायिक वापराच्या सिलेंडरमध्ये बेकायदा रिफिलिंग करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

एमपीसी न्यूज – घरगुती सिलेंडरमधील गॅस व्यावसायिक (Pune Crime News) वापराच्या सिलेंडरमध्ये बेकायदा रिफिलिंग करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हा प्रकार उघडकीस आणला.हा प्रकार सिंहगड रस्ता भागात  सुरू होता.

 

याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून सिंहगड पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

IPL 2023 : शेवटच्या षटकात गुजरात टायटन्सचा दमदार विजय

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील तुकाईनगर परिसर आणि वडगाव बुद्रुक येथे गॅस रिफिलिंग स्टेशनचा कोणताही परवाना न बाळगता बेकायदा विक्री करण्यात येत होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पाळत ठेवून छापा टाकला.

 

त्यावेळी काहीजण घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून रिफिलिंग पाइपचा वापर करून व्यावसायिक वापराच्या सिलेंडरमध्ये गॅस भरत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या ताब्यातून एचपी गॅस, भारत पेट्रोलियम कंपनीचे घरगुती आणि व्यावसायिक वापराचे 114 गॅस सिलेंडर, तीन टेंपोसह 17 लाख 22 हजार रुपयांचे (Pune Crime News) साहित्य जप्त करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.