Pune Crime News : ट्रकद्वारे आणलेल्या बेकायदेशीर गुटखाविक्रीचा पर्दाफाश 30 लाखांचा ऐवज जप्त, वानवडी पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – ट्रकमधून आणलेल्या बेकायदेशिररित्या गुटखा विक्रीचे रॅकेट वानवडी पोलिसांनी उध्वस्त केले आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेउन त्यांच्याकडून 20 लाखांचा गुटखा आणि ट्रक मिळून 29 लाख 59 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

रेवणनाथ काशिनाथ निंबाळकर (वय 25, रा.राजेवाडी, जामखेड) आणि गणपतसिंग बलवंतसिंग राजपूत ( वय 50, रा. बिबवेवाडी कोंढवा रस्ता) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

वानवडी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भोलेनाथ अहिवळे पथकासह हद्दीत बंदोबस्त करीत होते. त्यावेळी भैरोबानाला परिसरातून एका ट्रकमधून गुटख्याची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तत्काळ ही माहिती तपास पथकाला दिली. त्यानंतर पथकाने परिसरात सापळा रचून ट्रकचालक रेवणनाथ आणि गणपतसिंगला ताब्यात घेतले.

ट्रकमध्ये तपासणी केली असता, त्यामध्ये विमल मसाला, व्ही तंबाखू, आरएमडी, बाबा तंबाखू, एम सेंटेंड तंबाखू, ईगल तंबाखू, मजा मॅक्स तंबाखू, मिराज स्वदेशी तंबाखू असा मिळून 19 लाख 59 हजारांचा तंबाखूजन्य साठा जप्त करण्यात आला. त्याशिवाय गुटख्याची वाहतूक करणारा ट्रकही जप्त करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.