Pune crime News : शहरात चोरांचा सुळसुळाट, हडपसर व येरवडा भागात एका घरासह एक दुकान फोडले

एमपीसी न्यूज -पुणे शहरात चोरांचा सुळसुळाट सुरू आहे. हडपसर व येरवडा भागात एक घर आणि एक दुकान फोडून चोरी करणाऱ्या चोरट्यांनी लाखो रुपयांवर डल्ला मारला आहे.

पहिली घरफोडीची घटना हडपसर येथील फुरसुंगी गावात घडली असून, बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी 1 लाख 73 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. याप्रकरणी रवितेजा बेजवाडा (वय, 32, रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेजवाडा हे कामानिमित्त मूळ गावी गेले होते. यादरम्यान चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दागिने व रोकड असा 1 लाख 73 हजार किंमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

दुसरी दुकान फोडीची घटना येरवडा भागात घडली. याबाबत उमेश भोजवाणी (वय, 40) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोजवणी यांचे नगर रस्त्यावर ऐन. एम. वाईन्स शॉपी या नावाचे दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी शॉपी काल पहाटे फोडली. वाईन शॉपीमधून लोखंडी तिजोरी आणि 1 लाख 88 हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.