Pune Crime News : पत्रकार देवेंद्र जैनला अखेर अटक, अनेक दिवसांपासून होता फरार

एमपीसीन्यूज : खंडणी, फसवणूक आणि मोक्काच्या गुन्ह्यात अनेक दिवसांपासून फरार असलेला पत्रकार देवेंद्र जैन याला अखेर पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र ब-हाटे याला अटक केली होती. त्यानंतर आता देवेंद्र जैन याला देखील पोलिसांनी जेरबंद केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी, देवेंद्र जैन याच्याविरोधात शहरातील काही पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. रवींद्र ब-हाटे, शैलेश जगताप, देवेंद्र चेन आणि इतर काही आरोपीं विरोधात खंडणी आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी देवेंद्र जैनच्याविरोधात मोक्का कायद्यानुसार कारवाई केली होती. तेव्हापासून जैन हा फरार होता. मागील काही दिवसांपासून गुन्हे शाखेचे पोलिस त्याच्या मागावर होते.

देवेंद्र जैन याचाच सहकारी असलेला रवींद्र ब-हाटे याला काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी अटक केली. ब-हाटे याला मदत केल्याप्रकरणी त्याची पत्नी आणि मुलाला देखील पोलिसांनी अटक केली आहे. देवेंद्र जैन याच्याकडे दाखल असलेल्या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.