Pune Crime News : पेट्रोल पंपवरील कर्मचा-यांची रोकड लुटणाऱ्यांना अटक, कोंढवा पोलिसांची कामगिरी

एमपीसीन्यूज : पेट्रोलपंपावरील कामगाराला शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याकडील रोकड लुटणा-या दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 9 हजार 500  रूपये, कोयता, दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कानिफनाथ विनोद महापुरे (वय 23, रा.नानापेठ) आणि सोहेल उर्फ एस. एम. सलीम मुल्ला (वय 19, रा. शिवाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत राहूल डोलारे (वय 20, रा. कोंढवा) यांनी तक्रार दिली आहे.

कोंढव्यातील तालाब कंपनीजवळील एस. के. ऑटोकेअर पेट्रोलपंपावर डोलारे हे काम करतात. 22 डिसेंबरला मध्यरात्री ते जमा झालेली रोकड मोजत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी डोलारे यांना शस्त्राचा धाक दाखवून दहशत निर्माण केली.

त्यांच्याकडील 14 हजार रूपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून नेली. याप्रकरणी कोंढवा पोलिस तपास करत होते.

पोलिस कर्मचारी आदर्श चव्हाण आणि पोलीस नाईक सुदाम वावरे यांना आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कानिफनाथ आणि सोहेला अटक केली. त्यांच्याकडून रोकड व इतर ऐवज जप्त केला आहे.

ही कामगिरी पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, रमेश गरूड, नीलेश वणवे, अमित साळुंखे, सुदाम वावरे, संजीव कळंबे, ज्योतिबा पवार, आदर्श चव्हाण, किशोर वळे, लक्ष्मण होळकर यांच्या पथकाने केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.