Pune Crime News : ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ

एमपीसी न्यूज – लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या एका महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा मृतदेह सापडला.

मूळची पश्चिम बंगालची असलेली ही महिला पुण्यातील बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करत असल्याची देखील माहिती समोर येत आहे. सुमैया सलीम शेख (वय 35) असे या महिलेचे नाव आहे. समर्थ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या प्रकरणी प्राथमिक माहिती अशी की, समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाड्याच्या घरात एका सलून व्यवसायिकासोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये ही महिला राहत होती. चार दिवसांपूर्वी तिच्या घरात ग्रुप उग्र वास येत असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी जाऊन पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी शवविच्छेदनासाठी त्या महिलेचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर या महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. प्रथमदर्शनी तरी त्या महिलेचा खून झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. या महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणारा व्यक्तीदेखील बेपत्ता आहे. दरम्यान समर्थ पोलिसांनी या प्रकरणी सर्व शक्यता गृहीत धरून तपासाला सुरुवात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.