Pune Crime News : लॉकडाऊनमुळे काम नाही त्यात देणेकऱ्यांचा तगादा वाढला, असे पाऊल उचलले की…

एमपीसी न्यूज – लॉकडाऊन काळात हातचे काम गेले, कर्जाचा डोंगर वाढतच होता आणि दैनिक कर यांचा ससेमिरा देखील मागे लागला.. त्यामुळे अखेर चोरीच्या मार्गाकडे वळलेल्या एकाला पोलिसांनी अटक केली.

ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन साखळी हिसकवल्यानंतर खडक पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. अमोल विश्वनाथ शेरखाने (वय 36, रा. आंबेगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, देवदर्शनासाठी आलेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी पुण्यातील भांडी आळी येथून चोरून नेली होती. एका चोरट्याने पुण्याच्या मध्यवस्तीत सोन साखळी चोरत चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यानंतर पोलिसांनी या चोरट्याला पकडण्यासाठी सापळा रचला. प्राथमिक चौकशीत सदरील चोरटेच्या अंगावर पांढरे चट्टे असल्याचे पोलिसांना समजले होते.

दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील बोबडे शुक्रवार पेठेतील हिराबाग येथे गस्त घालत असताना त्यांना संशयित चोरटा दिसून आला. त्यांनी तात्काळ त्याच्यावर झडप घालत त्याला पकडले. त्यानंतर पथकाला बोलवत त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. यावेळी त्याने चोरलेले सोन साखळी त्याने घरात ठेवली होती. पोलिसांनी ती जप्त केली आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षांपासून लॉकडाऊन लागल्यानंतर त्याचा काम धंदा बंद झाला होता. तर काही मिळतही नव्हतं. त्यात लोकांचे पैसे देणे होत. त्यामुळे तो परेशान होता. त्यामुळे त्याने गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.