Pune Crime News : रस्त्यात अडवून मारहाण करत लुबाडले पैसे

एमपीसी न्यूज-पुण्यातील कर्वेनगर परिसरात पायी घरी निघालेल्या युवकांना भर रस्त्यात अडून डोक्यात बियरची बाटली फोडत लुबाडल्याचा प्रकार उघडकीस (Pune Crime News) आला आहे. रविवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कर्वेनगर येथील गोसावी वस्तीत हा प्रकार घडला.
वारजे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तुषार ज्ञानदेव धनवटे (वय 23) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी आणि फिर्यादीचा मित्र रविवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास गोसावी वस्तीतील मावळे आळी येथून जात होते. यावेळी तिघा जणांनी त्यांना अडवले. फिर्यादीच्या खिशातील 960 रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
फिर्यादीने त्याला विरोध केला असता त्यांच्या डोक्यात बियरची बाटली फोडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तर फिर्यादीच्या मित्राला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल (Pune Crime News) केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.