Pune Crime News : पोटाला पिस्तूल लावून व्यापाऱ्याला लुबाडले

एमपीसीन्यूज : पुण्यातील मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका व्यापाऱ्याला लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोटाला पिस्तूल लावून व्यापाऱ्याजवळील 44 हजार रुपये अज्ञात चोरट्याने लुबाडून नेले. केशवनगर मुंढवा येथील गणेश टिंबर मार्केट मध्ये ही घटना घडली.

मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जलाराम प्रभुजी प्रजापती यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांचा केशव नगरमध्ये गणेश टिंबर मार्केट या नावाने व्यवसाय आहे. शुक्रवारी दुपारी ते दुकानात एकटेच असताना दोन व्यक्ती अचानक दुकानात शिरले आणि त्यांनी ‘तुम्हारे पास वीस लाख रुपये आये है’, असे म्हणत त्यांना पिस्तूल दाखवले.

तर दुसऱ्या साथीदाराने गल्ल्यात पैसे आहेत का हे पाहताना जमा झालेले 44 हजार रुपये काढून घेतले.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.