Pune Crime News : लग्नाचे आमिष एकीला, लग्न मात्र दुसरी सोबतच, तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार शरीरसंबंध ठेवल्यानंतर लग्न मात्र दुसऱ्याच तरुणीसोबत केले. यानंतर फसवणूक केल्याप्रकरणी एका 22 वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीवरून संबंधित तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनीष मधुकर आदमाने (वय 22) त्याच्याविरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, डिसेंबर 2019 मध्ये पीडित तरुणी आणि आरोपीची ओळख झाली होती. ओळख झाल्यानंतर आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून आणि तिचा विश्वास संपादन करून मित्राच्या रूमवर घेऊन जात तिच्या इच्छेविरुद्ध संमतीविना शरीरसंबंध ठेवले. काही दिवसानंतर त्याने पीडित तरुणी सोबत लग्न न करता दुसऱ्याच मुली सोबत लग्न करून पीडित तरुणीचा विश्वासघात करून त्याची फसवणूक केली. तक्रार आल्यानंतर सिंहगड रस्ता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.

फूस लावून अल्पवयीन मुलीला पळविले

उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवनेरी परिसरात राहणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीला अज्ञात आरोपीने पळवून नेले आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये अज्ञात आरोपीने कशाचे तरी आमिष दाखवून या मुलीला पळवून नेल्याचे म्हटले आहे. उत्तमनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.