Pune Crime News : बनावट पावत्या सादर करुन ‘मिलीटरी फार्म्स’ची 39 लाखांची फसवणूक

0

एमपीसी न्यूज – पुण्यातील मिलीटरी फार्म्सची हैदराबादच्या दोन ठेकेदारांनी तब्बल 38 लाख 88 हजार रुपयांची फसवणूक केली. या ठेकेदाराने मिलिटरी फार्म्सला अन्नधान्य पुरवण्याचा ठेका घेताना बनावट ठेव पावत्या सादर करत ही फसवणूक केली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल अविनाश शर्मा (वय 50) यांनी फिर्याद दिली असून कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात या प्रकरणी धर्मा देवी ( आंध्रा सेल्स कार्पोरेशन, हैदराबाद) आम्ही मनोज अग्रवाल (बालाजी कार्पोरेशन, हैदराबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पुण्यातील सदन कमांड येथील मिलिटरी फार्म्स याठिकाणी 2012, 2013 आणि 2014 साली घडला आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सदर्न कमांड मधील मिलिटरी फार्म्स यांनी अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी निविदा काढल्या होत्या. यामध्ये वरील दोन्ही आरोपींनी सहभाग घेतला होता. या प्रक्रियेत दोन्ही फर्मने 38 लाख 88 हजार पाचशे रुपयांची नूतनीकरण ठेव पावत्या व फीड पुरवठा करावयाचे हप्ते पावत्या सादर केली. त्यानुसार त्यांना अन्नधान्य पुरवठा करण्याचा ठेका मिळाला व त्यांनी कामकाजही सुरु केले होते.

दरम्यान काही दिवसांनी लेफ्टनंट कर्नल शर्मा यांनी हैदराबाद येथील स्टेट बँक ऑफ इंडियाकडे त्यांनी ठेवलेल्या पावत्यांची शहानिशा केली. त्यावेळेस बँकेने अशा प्रकारच्या पूर्वी नूतनीकरणाच्या कोणत्याही ठेवी न ठेवण्याबाबत ची माहिती दिली. त्यानंतर वरील दोन्ही कंपन्यांनी मिलिट्री फार्म्सची फसवणूक केल्याचे लक्षात आले.

या दोन्ही कंपन्यानी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बनावट पावत्या तयार करून त्या खर्‍या असल्याचे भासवून लष्कराची तब्बल 38 लाख 88 हजार पाचशे रुपयांची फसवणूक केली. कोरेगाव पार्क पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment