Pune Crime News : गुंतवणूक केल्यास नफा मिळवून देण्याच्या आमिषाने लाखोंची फसवणूक

एमपीसी न्यूज – सोन्याच्या व्यवसायात चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिघांनी मिळून तरूणाकडून 2300 ग्रॅम सोने आणि अलिशान मोटार ताब्यात घेउन अपहार केला आहे. ही घटना मार्च 2017 ते मार्च 2021 काळात सॅलीसबरी पार्कमध्ये घडली.

समीर शौकत इनामदार शेख (वय 35,रा. वारजे, मूळ- परळी, सातारा), रश्मी समीर इमानदार ( वय 30), गौरीहर हनुमंत भागवत (वय 29, रा. सातारा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रीतेश बाबेल (वय 42, रा. सॅलसबरी पार्क) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फिर्यादी प्रीतेश आणि समीर यांच्या ओळख आहे. ओळखीतून समीरने प्रीतेशला सोन्याच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला नफा देण्याचे आमिष दाखवित 2300 ग्रॅम सोने ताब्यात घेतले. त्याशिवाय समीरने प्रीतेशकडून अलिशान मोटार खरेदी करून व्यवसायातून होणाऱ्या फायद्यातून मोटारीचे रक्कम देण्याचे कबूल केले.

विश्वास ठेउन प्रीतेशने समीरला रक्कम न घेता अलिशान मोटार ताब्यात दिली. त्यानंतर वारंवार पैसे मागूनही समीरने सोने आणि मोटारीचे पैसे देण्यास टाळाटाळ करीत फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय तपास करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.