Pune Crime News : गिफ्ट घेण्यास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीच्या तोंडावर ऍसिड फेकण्याची धमकी,  कुटुंबियांनाही मारहाण

एमपीसी न्यूज – एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला ब्रेसलेट गिफ्ट देण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने हे गिफ्ट नाकारले असता तिच्या तोंडावर ऍसिड फेकण्याची धमकी दिली. तर याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हाडा कॉलनी येथे हा प्रकार घडला.

सलोद्दीन पठाण, मुशरफ शेख, जुबेर बागवान आणि अन्य एका आरोपविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी मुश्रीफ शेख याने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिला पाहून शेरोशायरी केली. तसेच 15 मे रोजी तिला एक ब्रेसलेट गिफ्ट देण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलीने तो नाकारला असता आरोपींनी तिच्या तोंडावर ऍसिड भेट घेण्याची धमकी दिली.

दरम्यान पीडित मुली घरी गेल्यानंतर आईला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर फिर्यादी या आरोपीच्या घरी जाब विचारण्यासाठी केल्या असता आरोपीने संगनमत करून फिर्यादीला शिवीगाळ करत मारहाण केली. फिर्यादीच्या पतीच्या केसाला धरून त्यांचे डोके भिंतीवर आपटले. तर भांडणात मध्यस्थी करणाऱ्या फिर्यादीच्या दिराला आरोपी सलोद्दीन याने धारदार शस्त्राने डोक्यात मारहाण करून जखमी केले. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.